जयपूर -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २० फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा सहा शहरांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व संघ १३ फेब्रुवारीला जैव-सुरक्षित वातावरणात दाखल झाल्यानंतर त्यांच्या तीन वेळा करोना चाचणी घेण्यात येणार आहेत.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पर्धेच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात त्यांनी सहा ठिकाणांपैकी पाच ठिकाणांचा उल्लेख केला आहे. सुरत, इंदोर, बंगळुरु, कोलकाता आणि जयपूर ह्या प्रमुख शहरात ही स्पर्धा खेळावली जाणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना १३ फेब्रुवारीला बायो-बबलमध्ये यावे लागेल आणि त्यांनतर त्यांना तीन वेळा कोरोनाची चाचणी करावी लागेल.