महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विजय हजारे करंडक : मुंबईचा पुदुच्चेरीवर २३३ धावांनी विजय - mumbai beat puducherry by 233 runs

सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (नाबाद २२७) आणि सुर्यकुमार यादव (१३३) या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबई संघाने विजय हजारे करंडक स्पर्धेत पुदुच्चेरीवर सहज विजय मिळवला.

vijay hazare trophy 2021 : mumbai a big win against puducherry by 233 runs
विजय हजारे करंडक : मुंबईचा पुदुच्चेरीवर २३३ धावांनी विजय

By

Published : Feb 25, 2021, 6:38 PM IST

जयपूर - सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (नाबाद २२७) आणि सुर्यकुमार यादव (१३३) या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबई संघाने विजय हजारे करंडक स्पर्धेत पुदुच्चेरीवर सहज विजय मिळवला. मुंबईने एलिट ग्रुप डी मधील हा सामना २३३ धावांनी जिंकला.

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये आज मुंबईचा सामना पुदुच्चेरीविरोधात झाला. यात पुदुच्चेरीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी पुदुच्चेरीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पुदुच्चेरी संघाने तब्बल ९ गोलंदाजांचा वापर केला. पण त्यांना पृथ्वी शॉला बाद करण्यात अपयश आले.

पृथ्वी शॉ यानं १५२ चेंडूचा सामना करताना नाबाद २२७ धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ३१ चौकार ५ षटकार लगावले. शॉ यानं १४२ व्या चेंडूवर आपले द्विशतक पूर्ण केले. तर सुर्यकुमार यादव यानं अवघ्या ५८ चेंडूत १३३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २२ चौकार आणि ४ षटकार लगावले. पृथ्वी आणि सुर्यकुमार यादव यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ५० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ४५७ धावांचा डोंगर उभा केला.

मुंबईचे डोंगराएवढे मोठे आव्हान पुदुच्चेरीला पेलावले नाही. त्याचा संघ ३८.१ षटकात २२४ धावांवर ऑलआऊट झाला. कर्णधार दामोदरन रोहितने सर्वाधिक ६३ धावा केल्या. तर मुंबईकडून प्रशांत सोलंकीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. याशिवाय शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. यशस्वी जैस्वालला एक विकेट मिळाली.

हेही वाचा -IND VS ENG ३rd Test : फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, जो रूटचे ५ विकेट्स

हेही वाचा -NZ VS AUS : मार्टिन गुप्टीलने मोडला रोहित शर्माचा विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details