बंगळुरू - कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सय्यद मुश्ताक अली करंडकाद्वारे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली. ही टी-२० स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर नुकताच विजय हजारे करंडक स्पर्धेचा आरंभ झाला आहे. परंतु आता या स्पर्धेवर कोरोनाचे सावट पसरले आहे. या स्पर्धेत सहभागी, बिहार संघाच्या एक खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्या खेळाडूला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
बिहार क्रिकेट संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'आमच्या संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्या खेळाडूला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. तसेच त्याच्या संपर्कातील खेळाडूंना देखील संघापासून वेगळं करण्यात आलं आहे. ते आता बंगळुरूमध्ये आहेत आणि त्यांना आता प्रवास करता येणार नाही.'