मुंबई - विजय हजारे करंडक स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना मुंबई आणि कर्नाटक यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना गुजरात आणि उत्तर प्रदेश यांच्यात खेळला जाईल.
मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील सामना उद्या गुरुवारी (११) होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला आहे. यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल या स्पर्धेत सुसाट फॉर्मात आहे. त्याने या स्पर्धेत सलग चार शतकं झळकावली आहेत. तर दुसरीकडे मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ देखील लयीत आहे. उद्याच्या सामन्यात या दोघांच्या कामगिरीवर खास नजर आहे.