नवी दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेत नवख्या छत्तीसगडच्या संघाने दिग्गज मुंबई संघाचा पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात छत्तीसगडने मुंबईवर ५ धावांनी मात केली. या लढतीत मुंबईच्या फलंदाजांनी कमावले तर गोलंदाजांनी सामना गमावला. छत्तीसगडचा अमनदीप खरेने नाबाद शतकी खेळी करत संघाला पहिला विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकून छत्तीसगडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबईचे सलामीवीर जय बिस्ता आणि आदित्य तरे या दोघांनी सावध सुरुवात केली. जय बिस्ताला शशांक सिंहने माघारी धाडत मुंबईला पहिला धक्का दिला. यानंतर मात्र, मुंबईच्या फलंदाजांनी छत्तीसगडच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. आदित्य तरे, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ५ बाद ३१७ धावा केल्या.
हेही वाचा -#HBDLataDidi : 'आईची माया लावणाऱ्या लतादीदी', मास्टर ब्लास्टरने दिल्या शुभेच्छा