नागपूर- सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्यात विदर्भ संघाला यश मिळाले आहे. विजेत्या संघाचा कर्णधार फैज फजल सामना जिंकल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या यशाबद्दल सांगताना म्हणाला, सामन्यात दबाव असतो, परंतु हाच दबाव आमच्यासाठी फायद्याचा ठरला.
रणजी ट्रॉफी : आम्हाला दबावाचा फायदा झाला - फैज फजल - कर्णधार
विजेत्या संघाचा कर्णधार फैज फजल सामना जिंकल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या यशाबद्दल सांगताना म्हणाला, सामन्यात दबाव असतो, परंतु हाच दबाव आमच्यासाठी फायद्याचा ठरला.
विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल म्हणाला, की सर्व संघांवर जिंकण्यासाठी दबाव असतो. पण आम्हाला हा दबावच फायदेशीर ठरला. रणजी चषक उचलताना देखील सर्वांना विजेत्या संघाकडून खूप आशा असतात. त्यामुळे, आम्ही भाग्यवान आहोत. आम्हाला या दबावामधून खूप शिकायला मिळाले. आम्ही आतापर्यंत झालेले सर्व सामने हे योग्यरित्या खेळलो.
रणजीमध्ये यश मिळेल असे नसते, त्यासाठी सातत्याने मेहनत आवश्यक असते. कसोटी सामना सतत ४ दिवस खेळणे आणि ११ सामने जिंकणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य खेळावे लागते. घरच्या मैदानावर खेळणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते. सर्वांना अपेक्षा असतात आणि आम्ही त्या पूर्ण करत आलेलो आहे. त्यामुळे या यशाचे श्रेय हे सर्वांचे आहे, असे वक्तव्य रणजी विजेत्या विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल केले.