व्हिक्टोरिया -ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया पोलिस मॅच फिक्सिंग रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत. हे रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचे नाव समोर आले आहे. या व्यक्तीचा समावेश बीसीसीआयच्या काळ्या यादीमध्येही झाला असून हे प्रकरण टेनिसचे आंतरराष्ट्रीय सामने निश्चित करण्यासंबंधित आहे.
रवींदर दांडीवाल हे या भारतीय व्यक्तीचे नाव हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे व्हिक्टोरिया पोलिसांचे म्हणणे आहे. दांडीवाल हा चंदीगडजवळील मोहालीचा रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दांडीवाल हा बीसीसीआयच्या नजरेत होता.