महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'बंद दाराच्या आड गोष्टी घडत होत्या', निवृत्त फिलँडरचा गंभीर आरोप! - व्हर्नान फिलँडर सीएसए न्यूज

'बर्‍याच गोष्टी चुकीच्या झाल्या आणि मला पुढे जाण्यासाठी काय योग्य आहे हे ठरवायचे होते. माझे वय ३४ वर्षे आहे आणि माझ्याकडे वेळ आहे. क्रिकेट प्रशासनात काही त्रुटी नसती तर मी जास्त काळ खेळलो असतो', असा आरोप फिलँडरने केला आहे.

Vernon Philander blames CSA for early retirement
'बंद दाराच्या आड गोष्टी घडत होत्या', निवृत्त फिलँडरचा गंभीर आरोप!

By

Published : Feb 14, 2020, 1:42 PM IST

जोहान्सबर्ग -अलीकडेच क्रिकेटमधून निवृत्त झालेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलँडरने आपल्या निवृत्तीविषयी मोठा खुलासा केला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळात असणाऱ्या अस्थिर वातावरणामुळे लवकर निरोप घेण्याची वेळ आली असल्याचे फिलँडरने म्हटले आहे. 'बर्‍याच गोष्टी चुकीच्या झाल्या आणि मला पुढे जाण्यासाठी काय योग्य आहे हे ठरवायचे होते. माझे वय ३४ वर्षे आहे आणि माझ्याकडे वेळ आहे. क्रिकेट प्रशासनात काही त्रुटी नसती तर मी जास्त काळ खेळलो असतो', असा आरोप फिलँडरने केला आहे.

हेही वाचा -टीम इंडियाची न्यूझीलंड भ्रमंती, 'या' खेळाडूने शेअर केले अनुष्कासोबतचे फोटो

'एक खेळाडू म्हणून आपल्याला आता जिथे जावेसे वाटते तेथे जाणे पुरेसे आहे. मागील सीएसए प्रशासनाने फक्त स्वता:कडे पाहिले. त्यांना खेळाडूंची चिंता नव्हती. मला मागे वळून पाहणे कठीण आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूने संघात खेळायला हवे असे मी प्रशिक्षकाला उघडपणे सांगितले होते. तेव्हा मी सर्वोत्कृष्ट असल्याचे माझ्या प्रशिक्षकाने मला सांगितले. हे प्रशिक्षक माझ्या आणि काइलसोबत प्रामाणिक नव्हते. बंद दाराच्या आड गोष्टी घडत होत्या', असे फिलँडरने एका वृत्तसंस्थेद्वारे म्हटले आहे.

या वर्षी फिलँडरने इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. फिलँडरने या सामन्यापूर्वी आपल्या देशासाठी ९७ सामने खेळले असून यात त्याने २६१ बळी घेतले आहेत. त्याने २०११ मध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात इंग्लंडने यजमानांना ११९ धावांनी पराभूत केले.

ABOUT THE AUTHOR

...view details