महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वकरंडकाबाबत कोणतीही चिंता नाही - उस्मान ख्वाजा

एक वर्षाच्या बंदीनंतर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन होणार आहे.

ख्वाजा १

By

Published : Mar 4, 2019, 1:15 PM IST

नागपूर- एक वर्षाच्या बंदीनंतर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन होणार आहे. यामुळे विश्वकरंडकाच्या संघात जागा मिळणार का नाही, याबाबत आघाडीच्या फलंदाजांची चिंता वाढली आहे. परंतु, यावर उस्मान ख्वाजाने मत मांडले आहे.

ख्वाजा म्हणाला, सध्या माझ्यासाठी फक्त संघाचा विजय महत्त्वाचा आहे. मी एकदिवसीय संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. संघासाठी जेवढे शक्य आहे ते करताना सध्याच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. सामना जिंकण्यासाठी संघासाठी चांगली कामगिरी करणे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, यावर सध्या माझे सगळे लक्ष्य आहे.

स्मिथ-वॉर्नरची बंदी संपायला आणखीन २४ दिवस बाकी आहेत. स्मिथ-वॉर्नरविषयी बोलताना ख्वाजा म्हणाला, ते दोघेही उच्च दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी दीर्घकाळापासून चांगली कामगिरी केली आहे. ते संघात माघारी येतील तेव्हा खुल्या मनाने संघात त्यांचे स्वागत आहे.

उस्मान ख्वाजाने गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेद्वारे ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन केले आहे. पुनरागमन झाल्यानंतर खेळलेल्या ४ सामन्यात त्याने १६४ धावा केल्या आहेत. सध्या चालू असलेल्या मालिकेविषयी बोलताना ख्वाजा म्हणाला, पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करून सामना जिंकू.

ABOUT THE AUTHOR

...view details