न्यूयॉर्क- भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागल याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची मने जिंकली. पदार्पणात त्याचा सामना दिग्गज रॉजर फेडररविरुद्ध झाला. या सामन्यात त्याने फेडररला विजयासाठी चांगलेच झुंजवले. सुमितने पहिला सेटमध्ये धमाकेदार खेळी करत फेडररला ६-४ असे पराभूत केले. पण त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने जरी सामना जिंकला तरीपण या सामन्यात सुमितच्या लढाऊवृत्तीची चर्चा जास्त झाली.
IND VS WI : कोहली अॅन्ड कंपनीची क्रुझवर धम्माल मस्ती, फोटो व्हायरल
सुमित नागल याने टेनिसचा राजा असलेल्या रॉजर फेडरर विरुध्द मैदानात उतरला आणि त्याला चांगलेच झुंजवले. यामुळे सुमितचे सर्व स्तरातून क्रीडीप्रेमींनी कौतुक केले. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. विराटने सुमितची अनोख्या स्टाईलने स्तुती केली असून त्याने सुमितचा एक व्हिडिओ व फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुमित फेडरर विरुध्द पहिला सेट जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
US Open २०१९ : सुमित जिंकलस भावा..! दिग्गज रॉजर फेडररला झुंजवले
दरम्यान, भारतीय युवा टेनिसपटू सुमित नागल हा जागतिक क्रमवारीत १९० व्या स्थानी आहे. तो कारकिर्दीत प्रथमच वरिष्ठ स्तरावरील ग्रँण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने पाच वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररला पहिल्याच सेटमध्ये पराभूत करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, फेडररने अनुभवाच्या जोरावर सामन्यात बाजी मारली.