केपटाऊन -२०२० मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा रंगणार असून गतविजेत्या भारताचा 'अ' गटात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा -भारताच्या दोन दिग्गज महिला बॅडमिंटनपटूंचे वादळ उपांत्यपूर्व फेरीत घोंघावणार
दक्षिण आफ्रिकेने १९९८ मध्ये विश्वकरंडक आणि २०१४ मध्ये चॅम्पियन्स चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांना दोन विविध गटात जागा मिळाली आहे. न्यूझीलंड आपल्या पहिल्याच सामन्या जपानशी सामना करेल. विश्वकरंडक स्पर्धेचे भारतीय संघाने चारवेळा, ऑस्ट्रेलियाने तीन, पाकिस्तानने दोन आणि इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी एकवेळा विजेतेपद पटकावले आहे.
आयसीसीने सर्व संघांसाठी १२ ते १५ जानेवारीदरम्यान जोहान्सबर्ग आणि प्रिटोरीया येथे सराव सामने आयोजित केले आहेत.