नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गव्हर्निंग काउन्सिलने ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म अनअकॅडमीला यंदाच्या आयपीएलसाठी अधिकृत भागीदार (ऑफिशियल पार्टनर) म्हणून घोषणा केली. आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईत रंगणार आहे.
बीसीसीआयने सांगितले, की तीन हंगामासाठी अनअकॅडमी आयपीएलची भागीदार राहील. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले, ''२०२० ते २०२२ पर्यंत आयपीएलची अधिकृत सहकारी म्हणून अनअकॅडमीची निवड करण्यात आम्हाला आनंद झाला आहे. आयपीएल ही भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. आमचा विश्वास आहे, की भारतीय शिक्षण कंपनी अनअकॅडमी प्रेक्षक म्हणून लोकांच्या आकांक्षेवर खूप सकारात्मक परिणाम घडवून आणू शकते. विशेषत: कोट्यावधी तरुण जे आपले करिअर बनवण्यात गुंतले आहेत."