लाहोर -पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमलवरील बंदी दीड वर्षांनी कमी करण्यात आली आहे. क्रिकेट पाकिस्तानच्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (निवृत्त) फकीर मुहम्मद खोखर यांनी स्वतंत्र न्यायाधीश म्हणून उमर अकमल आणि दुसऱ्या पक्षाची बाजू ऐकल्यानंतर आपला निर्णय दिला.
सामना फिक्सिंग प्रस्तावाबद्दल मंडळाला माहिती न दिल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) उमरला क्रिकेटशी संबंधित सर्व कामकाजावर तीन वर्षासाठी बंदी घातली होती. आता त्याच्या बंदीला अवघ्या 18 महिन्यांचा कालावधी असल्याने 19 ऑगस्ट 2021 पासून तो पुन्हा क्रिकेट खेळू शकणार आहे.