कराची -पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमल मोठ्या संकटात सापडला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अँटी करप्शन कोडने (पीसीबी) अकमलवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा -डेव्हिड वॉर्नरची मोठ्या लीगमधून माघार, फ्रँचायझीला बसणार धक्का
अकमलवर कलम २.४.४ चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हे कलम भ्रष्टाचारी वृत्ती जाहीर करण्यात अपयशी ठरण्यासंबधी आहे. या प्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याला सहा महिन्यांच्या किवा आजीवन बंदीच्या निलंबनास सामोरे जाऊ शकते. अकमलला या संबधी प्रकरणावर उत्तर देण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे.
पाकिस्तान बोर्डाने भ्रष्टाचार विरोधी कलम ४.७१ नुसार अकमल याला निलंबित केले आहे. अकमलवर याआधीच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता आणि त्याची चौकशी सुरू होती. यामुळे पीसीबीने ही कारवाई आली असल्याचे म्हटले जात आहे. पण या विषयी बोलण्यात पाकिस्तान बोर्डाने नकार दिला आहे.
२९ वर्षीय उमर अकमलने पाकिस्तानसाठी शेवटचा सामना मार्च २०१९ मध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत १६ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामने खेळले आहेत.