लाहोर - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) उमर अकमलवर तीन वर्षासाठी बंदी घातली आहे. त्यांच्यावरील ही बंदी क्रिकेटच्या सर्व स्वरूपात लागू असेल. अकमलला फिक्सिंगच्या प्रस्तावाची मंडळाला माहिती न दिल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलवर ३ वर्षाची बंदी - umar akmal latest news
पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) पाचवी आवृत्ती सुरू होण्यापूर्वी अकमलला ही ऑफर देण्यात आली होती. पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेअंतर्गत एखाद्या खेळाडूला फिक्सिंगसाठी काही प्रस्ताव आल्यास ते विनाविलंब मंडळाला कळवावे असे बंधनकारक आहे. तसे न केल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे.

पीसीबीने ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. बोर्डाच्या शिस्त समितीचे अध्यक्ष न्यायाधीश (सेवानिवृत्त) फजल-ए-मीरान चौहान यांनी हा निर्णय घेतल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. पीसीबीने उमर अकमलला या प्रकरणात २० फेब्रुवारी रोजी तत्काळ प्रभावाने निलंबित केले होते. अकमलला पीएसएलमध्ये क्वेटा ग्लेडिएटर्स संघाकडून खेळण्यासही बंदी घातली होती.