दुबई- आयसीसीने आपल्या पंचांच्या डेव्हलमेंट पॅनलची घोषणा केली असून यात भारताची जननी नारायणन आणि वृंदा राठी यांना स्थान मिळाले आहे. जननी आणि वृंदा यांच्या समावेशानंतर या पॅनलमधील महिला संख्या १२ अशी झाली आहे.
३४ वर्षीय जननी या २०१८ पासून स्थानिक स्पर्धेत पंचगिरी करतात. त्यांनी सांगितलं की, 'निवडीनंतर आनंद झाला. आता मैदानावर अनुभवी लोकांकडून शिकण्याची संधी मिळाली आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये स्वत:मध्ये सुधारणा करण्याची मोठी संधी मिळाली आहे.'
वृंदा यांनी सांगितलं की, 'आयसीसीच्या पॅनलवर निवड होणे हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या संधीच्या माध्यमातून मला माझ्या ज्ञानामध्ये भर पाडण्याची संधी आहे. यामुळे मी खूप खुश आहे.'