मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. याआधी खेळाडूंसह स्टाप कर्मचाऱ्यांना एक आठवडा क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक संघातील खेळाडू आपापल्या संघाच्या सराव सत्रात भाग घेण्यासाठी रवाना होत आहेत.
कोलकाता नाइट रायडर्सचा स्फोटक खेळाडू आद्रें रसेल आणि सुनिल नरेन हे भारतात पोहोचले आहेत. दोघे वेस्ट इंडिजवरुन मुंबईत दाखल झाले आहेत. ते पुढील आठवडाभर क्वारंटाइन राहतील.
दरम्यान, कोलकाताचे काही खेळाडू रविवारी मुंबईत दाखल झाले आहेत. यात वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, वैभव अरोडा, दिनेश कार्तिकचा समावेश आहे.