नवी दिल्ली -दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. या घटनेनंतर फिरोजशाह कोटला परिसरात राज्य शाखेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. कोषाध्यक्ष व चार संचालक पदांसाठी ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान कोटला परिसरात निवडणूक होणार आहे.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - ddca employees test covid positive
डीडीसीएचे सहसचिव राजन मनचंदा म्हणाले,"दोन कर्मचारी नीरज शर्मा आणि प्रदीप बॅनर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना १८ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांची कार्यालये बंद केली गेली आहेत आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाईल."
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
डीडीसीएचे सहसचिव राजन मनचंदा म्हणाले,"दोन कर्मचारी नीरज शर्मा आणि प्रदीप बॅनर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यांना १८ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांची कार्यालये बंद केली गेली आहेत आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाईल."
संचालक पदासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सी. के. खन्ना यांची पत्नी शशी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्या गौतम गंभीरचे काक पवन गुलाटी यांच्या विरोधात उभ्या आहेत.