नवी दिल्ली - भारत-बांगलादेश संघामध्ये नियोजित पहिला टी-२० सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात पार पडला. बांगलादेशने या सामन्यात भारतावर मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, दिल्लीचा सामना गाजला प्रदूषणाच्या चर्चेने. पण अखेर हा सामना नियोजित कार्यक्रमानूसार खेळला गेला. आता प्रदूषणामुळे बांगलादेशी खेळाडूंना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या सामन्यानंतर बांगलादेशी खेळाडू सौम्या सरकार आणि आणखी एक खेळाडूला उलट्यांचा त्रास होत आहे.
दिल्लीच्या वाढलेल्या प्रदूषणामुळे सामना इतरस्थ हलवावा, अशी मागणी काही माजी खेळाडूंसह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने सामना दिल्लीतच होणार असे स्पष्ट केले. त्यानंतर सामना देखील पार पडला. मात्र, आता बांगलादेशी खेळाडू प्रदूषणाने आजारी पडल्याचे वृत्त आहे.