गुरुग्राम - गुरुग्राम पोलिसांनी मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून पोलिसांनी तीन मोबाइल फोन, एक लॅपटॉप, फोन चार्जर, लॅपटॉप चार्जर आणि एक रजिस्टर जप्त केले.
आरोपींना डीएलएफ फेज-3 च्या यू-ब्लॉकमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जनकपुरी येथील देसू कॉलनीतील रहिवासी सनी शर्मा आणि गुरुग्राम येथील दयानंद कॉलनीतील प्रवीण गांधी अशी आहेत.