मुंबई - कपिल देव यांच्या समितीने, शुक्रवारी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री यांची निवड केली. शास्त्री यांचा २०२१ साली होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकापर्यंत कार्यकाळ असणार आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत टॉम मूडी, माईक हेसन आणि रवी शास्त्री यांच्यामध्ये खरी चुरस होती. तेव्हा रवी शास्त्री यांनी यात अखेर बाजी मारली. रवी शास्त्री यांची निवड झाल्याने, विराट सेना जरी खूश असली तरी, चाहते मात्र नाखूश आहेत. यावर चाहत्यांनी मीम्सव्दारे, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक होणे म्हणजे, सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होण्यासारखे आहे, असे एका चाहत्याने म्हटले आहे.