नवी दिल्ली - लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्राव्होच्या शानदार फलंदाजीमुळे त्रिनबागो नाइट रायडर्सने (टीकेआर) पुन्हा एकदा कॅरेबियन प्रीमियम लीगचे (सीपीएल) विजेतेपद जिंकले आहे. २०१५, २०१७ आणि २०१८ नंतर टीकेआरचे हे चौथे सीपीएल विजेतेपद आहे. यंदाच्या सीपीएलच्या हंगामात टीकेआरने सर्व दहा सामने जिंकले. मुंबईचा अनुभवी लेगस्पिनर प्रवीण टीकेआरकडून खेळतो. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) खेळणारा तांबे हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
सेंट लुसिया झोक्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीकेआरने १८.१ षटकांत ८ गडी राखून १५५ धावांचे लक्ष्य पूर्ण करत चौथ्यांदा कॅरेबियन प्रीमियम लीगचा विजेता होण्याचा मान मिळवला. अंतिम सामना ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळवण्यात आला.