कोलंबो -ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मुडी यांची श्रीलंकेच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटने रविवारी ही माहिती दिली. श्रीलंका क्रिकेट संघाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनेनुसार दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध श्रीलंकेच्या खराब कामगिरीनंतर मुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मुडींसोबत तीन वर्षांचा करार केला आहे. या करारानुसार त्यांना ३०० दिवस अनिवार्य काम करावे लागेल. त्यांची नियुक्ती सोमवारपासून लागू होणार आहे.