वेलिंग्टन- न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम लाथनने केन विल्यमसनला धक्का देत न्यूझीलंडचा २०१९ सालचा सर्वश्रेष्ठ फलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे. न्यूझीलंड क्रिकेटमध्ये दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार दिला जातो. मागील ७ वर्षांपासून हा पुरस्कार केन विल्यमसन आणि रॉस टेलर पटकावत होते. पण यंदा लाथम सर्वश्रेष्ठ फलंदाज ठरला आहे.
टॉम लाथमने ऑगस्ट २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळताना १५४ धावांची खेळी केली होती. त्याच्या याच खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत बरोबरी साधली होती. लाथमने मागील वर्षी ९ कसोटी सामन्यात ४०.५३ च्या सरासरीने ६०८ धावा केल्या आहेत.