ब्रिस्बेन - एकीकडे लिओ कार्टरने सहा षटकारांचा विक्रम नोंदवला तर, दुसरीकडे सोमवारी टॉम बेंटनने लागोपाठ ५ षटकार ठोकले. बेंटनने बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीटकडून खेळताना सिडनी थंडर विरूद्ध एका षटकात पाच षटकार मारले. शिवाय, त्याने १९ चेंडूत ५६ धावा फटकावून लीगच्या इतिहासातील दुसर्या वेगवान अर्धशतकाचा कारनामाही करून दाखवला.
हेही वाचा -'दोस्ती तर आहे आमची राईट, पण मॅटवर गेल्यावर चुरशीची होईल फाईट'
इंग्लंड संघाचा विस्फोटक सलामीवीर म्हणून ओळख असलेल्या बेंटनने या खेळीदरम्यान सात षटकार आणि दोन चौकार लगावले. त्याच्या खेळीमुळे ब्रिस्बेन हीटचा संघ या सामन्यात आठ षटकांत ११९ धावा करू शकला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने २१ वर्षीय बेंटनला एक कोटीची बोली लावून संघात घेतले आहे.
बेंटनने आतापर्यंत इंग्लंडकडून तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५६ धावा केल्या आहेत.