चेपॉक -श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. मलिंगा हा त्याच्या भन्नाट यॉर्कर आणि विशिष्ट बॉलिंग अॅक्शनसाठी ओळखला जातो. अशी अॅक्शन आतापर्यंत कुठेही आढळली नव्हती. मात्र, तामिळनाडू प्रिमियर लीगमध्ये एक गोलंदाज सापडला असून तो एका डोळ्याने मलिंगासारखा भन्नाट यॉर्कर टाकतो.
TNPL : एका डोळ्याने अधू असूनही 'तो' टाकतो मलिंगासारखा भन्नाट यॉर्कर...पाहा व्हिडिओ - चेपॉक सुपर गिल्लीज
यंदाच्या हंगामात डिंडीगुल ड्रॅगन्सविरुद्ध पेरियास्वामीने पहिल्यांदा पदार्पण केले.
TNPL : एका डोळ्याने टाकतो मलिंगासारखा भन्नाट यॉर्कर...पाहा व्हिडिओ
हा खेळाडू टीएनपीएलच्या चेपॉक सुपर गिल्लीजकडून खेळतो. त्याचे नाव आहे जी. पेरियास्वामी. यंदाच्या हंगामात डिंडीगुल ड्रॅगन्सविरुद्ध पेरियास्वामीने पहिल्यांदा पदार्पण केले. सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे पेरियास्वामी एका डोळ्याने पाहू शकत नाही. २५ वर्षीय पेरियास्वामीला गोलंदाजी करताना पाहिल्यावर मलिंगा आणि बुमराहची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्याच्या गोलंदाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.