मेलबर्न -भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज टीम पेन यांचे 'बेबीसीट' प्रकरण चांगलेच गाजले होते. मैदानावरील या प्रकरणानंतर पंतचा टीम पेनच्या बायको आणि मुलांसोबत एक फोटोही व्हायरल झाला होता. हाच टीम पेन आपली क्रिकेटमधील निवृत्ती लवकरच जाहीर करू शकतो.
हेही वाचा -FIFA World Cup qualifier : ओमानविरुध्दच्या 'करो या मरो' सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज
पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता असल्याचे पेन यांने सोमवारी सांगितले आहे. 'हा माझा शेवटचा दौरा असू शकतो. मला याबद्दल खात्री नाही. परंतु मी त्याचा आनंद घेत आहे. मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले वाटते', असे पत्रकारांशी संवाद साधताना पेनने म्हटले आहे.
'मला काय करावे लागेल आणि काय प्राप्त करायचे आहे हे मला माहित आहे. या वयात गोष्टी लगेच बदलतात. मी या दौऱ्यासाठी तयार आहे', असेही पेनने म्हटले आहे. ३४ वर्षीय पेनने ऑस्ट्रेलियासाठी आत्तापर्यंत २६ कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर ११६४ धावा जमा आहेत.