महाराष्ट्र

maharashtra

"आत्तापर्यंत मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी स्मिथच भारी"

By

Published : Sep 9, 2019, 2:46 PM IST

पेनने सामन्यानंतर सांगितले, 'आम्ही या सामन्यात नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न केला, हेडिंग्ले कसोटीनंतर आम्ही संपूर्ण आठवडाभर स्वतःला सांभाळले आणि या विजयाची तयारी केली. . लाबुशाननेही चांगली गोलंदाजी केली. तो एक महान खेळाडू आहे. आणि खेळासाठी तो भूकेला आहे. मी आत्तापर्यंत जेवढे खेळाडू पाहिलेत त्यापैकी स्मिथ सर्वोत्तम खेळाडू आहे.

"आत्तापर्यंत मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी स्मिथच भारी"

नवी दिल्ली -अ‌ॅशेसमधील चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळाल्यानंतर कर्णधार टीम पेन भलताच खुष झाला आहे. आत्तापर्यंत झालेल्या मालिकेत तुफान फॉर्मात असणाऱ्या फलंदाज स्टीव स्मिथचे त्याने तोंड भरून कौतुक केले आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या फलंदाजांपैकी स्मिथच सर्वोत्कृष्ट असल्याचे पेनने म्हटले आहे.

स्टीव स्मिथ

हेही वाचा -'स्मिथने कितीही चांगले प्रदर्शन केले तरी तो चीटर म्हणूनच ओळखला जाईल'

पेनने सामन्यानंतर सांगितले, 'आम्ही या सामन्यात नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न केला, हेडिंग्ले कसोटीनंतर आम्ही संपूर्ण आठवडाभर स्वतःला सांभाळले आणि या विजयाची तयारी केली. लाबुशाननेही चांगली गोलंदाजी केली. तो एक महान खेळाडू आहे. आणि खेळासाठी तो भूकेला आहे. मी आत्तापर्यंत जेवढे खेळाडू पाहिलेत त्यापैकी स्मिथ सर्वोत्तम खेळाडू आहे.

स्मिथने या मालिकेत १३४.२ च्या सरासरीने ६७१ धावा केल्या. त्याने चार सामन्यांमध्ये तीनशे धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना १८५ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी बढत घेतली आहे. शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंड संघाला ३८३ धावा करावयाच्या होत्या. मात्र, इंग्लंडचा संघ १९७ धावांवर आटोपला. पहिल्या डावात २११ आणि दुसऱ्या डावात ८२ धावांची खेळी करणाऱ्या स्मिथला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद, ४९७ धावा केल्या होत्या तर इग्लंडने ३०१ धावा केल्या. तसेच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ६ बाद, १८६ धावांवर डाव घोषीत केला होता. आता इंग्ल्ंडसाठी ३८३ धावा करणे गरजेचे होते. मात्र, इंग्लंडला हे लक्ष्य पुर्ण करता आले नाही व त्यामुळे पराभव स्विकारावा लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details