दुबई - ऑस्ट्रेलियात २०२२ साली होणाऱ्या, पुरुषांच्या टी-२० विश्वकरंडकासाठी आफ्रिका आणि आशिया खंडात होणारे पात्रता फेरीचे सामने आयसीसीने स्थगित केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयसीसीचे हा निर्णय घेतला आहे.
आशियात ३ ते ९ एप्रिल या दरम्यान पात्रता फेरीचे सामने होणार होते. यात बहरीन, कुवैत, मालदीव, कतार आणि सौदी अरेबिया या देशांचे संघ होते. आता ही स्पर्धा २३ ते २९ ऑक्टोबर या काळात घेतली जाणार आहेत. तर आफ्रिका ए आणि बी यांचे पात्रता सामने या वर्षी एप्रिल महिन्यात होणार होते. पण आता ते २५ ते ३१ ऑक्टोबर या काळात होतील. हे सामने धाना, लेसोथो, मालावी, रवांडा, स्वित्झर्लंड, युगांडासह अन्य देशात होणार आहेत.