नवी दिल्ली - न्यूझीलंड दौर्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील आणखी तीन सदस्य कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये कोरोना संक्रमित सदस्यांची संख्या १० झाली आहे. खेळाडूंची अजून एक चाचणी बाकी आहे.
हेही वाचा -लुईस हॅमिल्टनला कोरोनाची लागण
पाकिस्तानचा संघ सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. न्यूझीलंडचे आरोग्य मंत्रालय या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे. संघाच्या सरावावरही बंदी घालण्यात आली होती. न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याच्या सहाव्या दिवशी पाकिस्तान संघातील ४६ सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्या सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल याआधी निगेटिव्ह आला होता, त्यातील तीन खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत.