गुरुग्राम - आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टेबाजी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुग्राम पोलिसांनी ही कारवाई केली. गुरुग्रामच्या सेक्टर १०७च्या ट्यूलिप सोसायटीमधून ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून सामानही जप्त करण्यात आले आहे.
IPL 2020 : चेन्नई-दिल्ली सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी तिघांना अटक - arrest for ipl betting
गुरुग्राममधील ज्योती पार्क येथील रहिवासी कपिल, गुरुग्राममधील अर्जुन नगर येथील रहिवासी नितीन आणि गुरुग्राममधील राम नगरमध्ये राहणारा अविनाश अशी आरोपींची नावे आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्यासाठी ही सट्टेबाजी सुरू होती.
![IPL 2020 : चेन्नई-दिल्ली सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी तिघांना अटक Three arrested for betting on IPL match in haryana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8951864-thumbnail-3x2-ffff.jpg)
या सामानात एक सूटकेस, तीन मोबाइल फोन, एक नोटबुक, एक लॅपटॉप आणि एक पेन ड्राईव्ह आहे. गुरुग्राममधील ज्योती पार्क येथील रहिवासी कपिल, गुरुग्राममधील अर्जुन नगर येथील रहिवासी नितीन आणि गुरुग्राममधील राम नगरमध्ये राहणारा अविनाश अशी आरोपींची नावे आहेत.
गुरुग्रामचे पोलीस अधिकारी सुभाष बाकेन म्हणाले, "विशिष्ट माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि तिघांना अटक केली. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्यासाठी सट्टेबाजी सुरू होती. पोलिसांनी बादशाहपूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.''