मुंबई - आज जरी केनियाच्या संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा नसला तरी २००३ च्या विश्वचषकात त्यांच्या दमदार कामगिरीने साऱ्याच्या भुवया उंचावल्या होत्या. कुणाला विश्वासही नव्हता की केनियाचा संघ विश्वचषकाच्या उपांत्यफेरीपर्यंत मजल मारेल. अंडरडॉग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाने आफ्रिकेच्या भूमिवर मोठाच उलटफेर करून दाखविला.
२० मार्च २००३ साली म्हणजेच बरोबर १६ वर्षापूर्वी भारताचा सेमीफायनलमधील सामना केनियाशी झाला. याच सामन्यात भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने शतक ठोकून केनियाला स्पर्धेतून बाहेर काढले.
भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ४ बाद २७० धावा कुटल्या. सौरवने त्यात १११ तर सचिन तेंडुलकर यांने ८३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात केनियाचा संघ १७९ धावांवर गडगडला. त्यात कर्णधार स्टीव्ह टिकोलो ने ५६ धावांची झुंझार खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला यश आले नाही.