महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हिटमॅनची 'ती' 'मॅरेथॉन' खेळी: एका जीवनदानानंतर ३३ चौकार व ९ षटकारांची आतिषी फटकेबाजी

आज १३ नोव्हेंबर २०१९, याच दिवशी पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ ला ईडन गार्डन्सच्या मैदानावर रोहित शर्मा नावाचे तुफान आले होते. रोहितने आजच्या दिवशी श्रीलंकेविरुध्द झालेल्या एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची 'मॅरेथॉन' खेळी केली होती. त्याने या सामन्यात २६४ मधील १८६ धावा तर ४१ चेंडूत जमवल्या होत्या. १७३ चेंडूत २६४ धावांच्या खेळीत त्याने तब्बल ३३ चौकार आणि ९ खणखणीत षटकार ठोकले होते.

हिटमॅनची 'ती' खेळी: ४ धावांवर सुटला झेल, मग काय 33 चौकार ९ षटकारांसह झोडपल्या २६४ धावा

By

Published : Nov 13, 2019, 11:07 AM IST

Updated : Nov 13, 2019, 11:24 AM IST

नवी दिल्ली - भारतीय संघ पहिल्यांदा २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. मात्र, या सामन्याआधी आजपासून ५ वर्षापूर्वी 'हिटमॅन' रोहित शर्माने याच मैदानावर एक दणकेबाज खेळी केली होती. ती खेळी आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे.

आज १३ नोव्हेंबर २०१९, याच दिवशी पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ ला ईडन गार्डन्सच्या मैदानावर रोहित शर्मा नावाचे तुफान आले होते. रोहितने आजच्या दिवशी श्रीलंकेविरुध्द झालेल्या एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची 'मॅरेथॉन' खेळी केली होती. त्याने या सामन्यात २६४ मधील १८६ धावा तर ४१ चेंडूत जमवल्या होत्या. १७३ चेंडूत २६४ धावांच्या खेळीत त्याने तब्बल ३३ चौकार आणि ९ खणखणीत षटकार ठोकले होते.

रोहित शर्माच्या या खेळीने भारताने निर्धारित ५० षटकात ५ गडी बाद ४०४ धावा केल्या. तेव्हा प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २५१ धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना १५३ धावांनी जिंकला होता.

विशेष बाब म्हणजे रोहित ही खेळी साकारण्यापूर्वी नर्वस होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, 'दुखापतीतून सावरल्यानंतर मी तब्बल ३ महिन्यानंतर पहिलाच सामना खेळत होते. त्यामुळे मला थोडीशी भिती वाटत होती. मी ही गोष्ट पत्नी रितीकालाही सांगितली होती. मी मैदानावर टिकून राहण्याचा निर्धार केला. तेव्हा मला ही खेळी साकारता आली.'

मी जेव्हा २६४ धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतलो. तेव्हा संघाचे प्रशिक्षक डंकन प्लेचर यांनी सांगितलं की तु ३०० करु शकला असतास. सुरुवातीला तु संथ खेळलास. मी त्यांना म्हणालो. तुम्हाला २६४ कमी वाटत आहेत की काय ? हा किस्साही त्याने मुलाखतीदरम्यान सांगितला.

त्या खेळीनंतर मी जिथं जाईन तिथं लोक मला ३०० कधी करणार असे विचारत होते, असेही रोहितने सांगितले. दरम्यान, रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत तीन द्विशतक झळकावले आहेत. त्याने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द बंगळुरुमध्ये खेळताना २०९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने श्रीलंका विरुध्द २०१४ मध्ये २६४ धावा केल्या. तसेच त्याने २०१७ मध्ये श्रीलंका विरोधातच नाबाद २०८ धावा केल्या होत्या.

Last Updated : Nov 13, 2019, 11:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details