महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० Final : दिल्लीच्या 'या' पाच खेळाडूंचा मुंबई संघाला धोका; कोण आहेत जाणून घ्या... - आयपीएल २०२० अंतिम सामना

आयपीएलचा अंतिम सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्लीचे खेळाडू कागिसो रबाडा, श्रेयस अय्यर, शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस आणि एनरिक नार्जिया हे मुंबईसमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतात.

These 5 players of Delhi will be seen in the title fight
IPL २०२० Final : दिल्लीच्या 'या' पाच खेळाडूंपासून मुंबई संघाला धोका; कोण आहेत जाणून घ्या...

By

Published : Nov 10, 2020, 5:27 PM IST

दुबई -आयपीएलच्या तेराव्या हंगामात धडाकेबाज सुरूवात केल्यानंतर दिल्लीची गाडी साखळी फेरी संपता-संपता रुळांवरून घसरली. मात्र, सुरुवातीच्या कामगिरीच्या जोरावर दिल्लीचा संघ टॉप-४मध्ये स्थान मिळवू शकला. यात त्यांनी, त्यांच्या अखेरच्या साखळी फेरीतील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. पण त्यांना क्वालिफायर सामन्यात मुंबईने मात दिली. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असल्याने दिल्लीला आणखी क्वालिफायर सामना खेळण्यास मिळाला. यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून पहिल्यांदाच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दिल्लीला अंतिम फेरी गाठून देण्यात संघातील 'या' पाच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. आजच्या अंतिम सामन्यात हेच खेळाडू मुंबईसमोर आव्हान निर्माण करू शकतात. वाचा कोण आहेत ते खेळाडू...

कागिसो रबाडा

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात भेदक मारा केला आहे. त्याने या हंगामात २९ गडी बाद केले आहेत.

कागिसो रबाडा

शिखर धवन

भारताचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने या हंगामात १४५.६५च्या स्टाइक रेटने ६०३ धावा केल्या आहे. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धवन केएल राहुलनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

शिखर धवन

मार्कस स्टॉयनिस

ऑस्ट्रेलियाच्या मार्क स्टॉयनिसने या हंगामात आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहेत. त्याने फलंदाजीत ३५२ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने १२ गड्यांना तंबूत धाडले आहे.

मार्कस स्टॉयनिस

श्रेयस अय्यर

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने १६ सामन्यांत ४५४ धावा जमवल्या आहेत. यातील अनेक सामन्यात तो सामनावीर ठरला आहे. याशिवाय त्याने मोक्याच्या क्षणी योग्य रणणिती आखत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली आहे.

श्रेयस अय्यर

एनरिक नॉर्जिया

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नार्जियाने या हंगामात वेगवान मारा केला आहे. त्याने आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे. याशिवाय त्याने १५ सामन्यात २० गडी बाद केले आहेत.

एनरिक नार्जिया

हेही वाचा -IPL २०२० Final : 'कमी लेखू नका, आमची सर्वोत्तम कामगिरी शिल्लक', पॉन्टिंग मुंबईला इशारा

हेही वाचा -IPL २०२० MI vs DC Final : दिल्लीची 'दिवाळी' की मुंबई मारणार 'पंच'

ABOUT THE AUTHOR

...view details