मुंबई -संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. या निकालात न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रतिवादी मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. क्रीडा विश्वातूनहीअनेक दिग्गजांनी या निर्णयाचे स्वागत केले.
हेही वाचा -किवींचे नशीबचं खराब.. इंग्लंड-न्यूझीलंड टी-२० सामना 'टाय', सुपर ओव्हरमध्ये साहेबांची बाजी
अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने ट्विटवर लिहिले, की 'हे केवळ भारतातच होऊ शकते. होय, न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांनी सहमतीने घेतलेल्या निर्णयामध्ये सामील होते आणि केके मोहम्मद यांनी ऐतिहासिक कागदपत्रे दिली. कोणत्याही विचारधारेपेक्षा भारताची विचारधारा बरीच मोठी आहे. प्रत्येकजण आनंदी रहा, मी शांती, प्रेम आणि सुसंवाद यासाठी प्रार्थना करतो.'
या निकालावर भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि गीता फोगट यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.