सिडनी -ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ सध्या स्वप्नवत क्रिकेट खेळत आहे. बंदीच्या कालावधीनंतर स्मिथने दमदार कामगिरी करत टीकाकारांची तोंडे बंद केली. सध्या तो न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतही चांगले प्रदर्शन करत आहे. याच मालिकेतील तिसऱ्या कसोटीत स्मिथने पहिली धाव घेताच चाहत्यांनी त्याला मनमुराद दाद दिली.
पहिली धाव काढताच प्रेक्षकांनी वाजवल्या टाळ्या, वाचा स्मिथने नक्की केले तरी काय?
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ४५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या स्मिथने पहिली धाव काढण्यासाठी तब्बल ३९ चेंडूचा सामना केला. त्यामुळे पहिली धाव घेताच सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मैदानात टाळ्यांचा कडकडाट केला.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ४५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या स्मिथने पहिली धाव काढण्यासाठी तब्बल ३९ चेंडूचा सामना केला. त्यामुळे पहिली धाव घेताच सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मैदानात टाळ्यांचा कडकडाट केला. या सामन्यासाठी केन विलियम्सनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी कर्णधारपद टॉम लॅथमकडे सोपवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
फलंदाजीस उतरलेल्या वॉर्नर आणि बर्न्स या जोडीने पहिल्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या. कॉलीन डी ग्रँडहोमने बर्न्सला १८ धावांवर माघारी पाठवले. वॉर्नर आणि लाबुशानेने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. नील वॅगनरने वॉर्नरला माघारी पाठवले. या सामन्यात मार्नस लाबुशानेने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला आहे.