महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

१९ वर्षांखालील वर्ल्डकप पात्रता स्पर्धेची पुन्हा घोषणा

या स्पर्धेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांनी यापूर्वीच आपले स्थान निश्चित केले होते. उर्वरित पाच जागांसाठी प्रादेशिक पात्रता असेल.

The road to the under 19 men's cricket world cup 2022 confirmed
१९ वर्षांखालील वर्ल्डकप पात्रता स्पर्धेची पुन्हा घोषणा

By

Published : Dec 14, 2020, 11:16 AM IST

दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२२ मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप पात्रता स्पर्धेचे वेळापत्रक पुन्हा जाहीर केले. वर्ल्डकपमध्ये पाच ठिकाणी ३३ संघ सामने खेळतील. या स्पर्धेचा १४वा हंगाम वेस्ट इंडिजमध्ये २०२२च्या सुरुवातीस होणार आहे.

हेही वाचा -सुरेश रैना इज बॅक!...'या' स्पर्धेत खेळणार असल्याची दिली कबुली

या स्पर्धेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांनी यापूर्वीच आपले स्थान निश्चित केले होते. उर्वरित पाच जागांसाठी प्रादेशिक पात्रता असेल.

वर्ल्डकप पात्रता स्पर्धेची पुन्हा घोषणा

जून २०२१ पासून सुरू होणाऱ्या सात प्रादेशिक कार्यक्रमांद्वारे ३३ ठिकाणांचा निर्णय घेतला जाईल. आफ्रिका आणि आशियात भरपूर संघ असल्याने तेथे दोन पात्रता प्रभाग असतील. अन्य तीन क्षेत्र अमेरिका, ईएपी आणि युरोप संघांमध्ये विभागीय पात्रता प्रक्रिया असेल. प्रत्येक प्रादेशिक पात्रतेचा विजेता संघ २०२२च्या वर्ल्डकपमध्ये आपले स्थान निश्चित करेल.

गतविजेता बांगलादेश संघ

ABOUT THE AUTHOR

...view details