नवी दिल्ली -भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचे उर्वरित दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. हे सामने १५ मार्च आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे लखनऊ आणि कोलकाता येथे खेळले जाणार होते. वृत्तसंस्था पीटीआयने ही माहिती दिली.
भारत वि. दक्षिण आफ्रिका मालिका रद्द! - भारत वि. दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका लेटेस्ट न्यूज
या मालिकेचे उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले होते. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे धुवून गेला.
या मालिकेचे उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले होते. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे धुवून गेला. पण आता उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत.
आयपीएलही पुढे -
बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती. कोरोनो व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.