महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

युवा गोलंदाज नसीम शाह विश्वचषकाबाहेर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा निर्णय - नसीम शाह लेटेस्ट न्यूज

नसीमने पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाबरोबर तीन कसोटी सामने खेळले असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान म्हणाले की, 'आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कप हा युवा खेळाडूंसाठी मोठा टप्पा आहे. नसीम शाहने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आणि स्वत: ला सिद्ध केले आहे. तो संघात नसल्याने पाकिस्तानच्या हेतूला कोणताही धक्का लागणार नाही. कारण निवडकर्त्यांनी अनुभवी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या संघाची निवड केली आहे.'

The Pakistan Cricket Board has withdrawn fast-bowler Naseem Shah from ICC U19 Cricket World Cup
युवा गोलंदाज नसीम शाह विश्वचषकाबाहेर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा निर्णय

By

Published : Jan 1, 2020, 3:38 PM IST

लाहोर - दक्षिण आफ्रिकेतील १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेला या महिन्यात सुरूवात होत आहे. पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहला मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघाबाहेर ठेवले आहे. पीसीबीने याची माहिती दिली. शाहच्या जागी मोहम्मद वसीम जुरला संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा -५ ग्रँडस्लॅम विजेती रशियन टेनिस सुंदरी मैदानावर परतणार!

नसीमने पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाबरोबर तीन कसोटी सामने खेळले असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान म्हणाले की, 'आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कप हा युवा खेळाडूंसाठी मोठा टप्पा आहे. नसीम शाहने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आणि स्वत: ला सिद्ध केले आहे. तो संघात नसल्याने पाकिस्तानच्या हेतूला कोणताही धक्का लागणार नाही. कारण निवडकर्त्यांनी अनुभवी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या संघाची निवड केली आहे.'

नसीम शाह कसोटी क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा सर्वात कमी वयाचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी नसीमने ही कामगिरी केली होती. त्याने ३१ धावा देत लंकेचा अर्धा संघ गारद केला. हा विक्रम नोंदवताना नसीमचे वय १६ वर्षे आणि ३०७ दिवस होते. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या नावावर होता. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी ५ बळी घेण्याची किमया केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details