मेलबर्न - या वर्षाच्या अखेरीस होणाऱा टी-20 वर्ल्डकप रिकाम्या स्टेडियममध्ये आयोजित करावा लागेल की नाही, हा खरा मुद्दा असल्याचे ऑस्ट्रेलियाचे क्रीडामंत्री रिचर्ड कोलबेक यांनी म्हटले आहे. कोलबेक म्हणाले, "भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसोबतच मला टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही पाहायची आहे."
कोलबेक यांनी सांगितले, की हा मुद्दा संघांविषयी नसून प्रेक्षकांविषयी आहे ज्याचा आपण काळजीपूर्वक विचार करीत आहोत. याला कदाचित जागतिक क्रिकेटही बारकाईने पाहणार आहे. कोरोनामुळे सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या असून ऑस्ट्रेलियामधील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेवरही टांगती तलवार आहे.