नवी दिल्ली - न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक डॅनी मॉरिसन यांनी महेंद्रसिंह धोनीला रोहित शर्मापेक्षा आयपीएलच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये स्थान दिले आहे. मॉरिसन म्हणाले, की या दोघांमध्ये निवड करणे अवघड आहे, परंतु प्रभावामुळे धोनी रोहितच्या पुढे आहे.
“ऊर्जा आणि प्रेरणेमुळे धोनी रोहितच्या पुढे” - danny Morrison on rohit and dhoni coparison news
मॉरिसन म्हणाले, “चेन्नईसाठी धोनी जी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन येतो आणि भारतासाठी जे त्याने केले आहे त्यामुळे खूप बदल झाला आहे. हो, नक्कीच त्याचे वय झाले आहे. आणि आता तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु रोहितकडे अजूनही वेळ आहे. धोनी जितका दबाव घेऊ शकेल, तेवढा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही.”
![“ऊर्जा आणि प्रेरणेमुळे धोनी रोहितच्या पुढे” The energy and inspiration dhoni brings that keeps him ahead of rohit said danny Morrison](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6856216-thumbnail-3x2-rohima.jpg)
“ऊर्जा आणि प्रेरणेमुळे धोनी रोहितच्या पुढे”
मॉरिसन म्हणाले, “चेन्नईसाठी धोनी जी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन येतो आणि भारतासाठी जे त्याने केले आहे त्यामुळे खूप बदल झाला आहे. हो, नक्कीच त्याचे वय झाले आहे. आणि आता तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु रोहितकडे अजूनही वेळ आहे. धोनी जितका दबाव घेऊ शकेल, तेवढा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही.”
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा, तर रोहितच्या नेतृत्वात मुंबईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.