नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे भारत सरकारने 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. मात्र, आता दोन महिन्यानंतर विविध अटींवर क्रीडाविषयक उपक्रम सुरू झाले आहेत. जगभरातही मार्गदर्शक सूचनांच्या अटींवर क्रीडा क्रियाकलाप सुरू करण्यात आले आहेत. अशातच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळाडूंसाठी शिबीर सत्राच्या आयोजनाचा विचार करत आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांने ही माहिती दिली. ते म्हणाले, ''एकदा पावसाळा संपला की आम्ही तयारीचा विचार करत आहोत. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आम्ही खेळाडूंच्या पुनरागमनाचा विचार करत आहोत. हे खेळाडू लॉकडाऊनमध्येही आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहेत. "