कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनची (सीएबी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३० डिसेंबर रोजी होणार आहे. शनिवारी या बैठकीची माहिती देण्यात आली. कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी एका निवेदनात म्हटले की, ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता एजीएमची बैठक होईल.
हेही वाचा -चेतेश्वर पुजाराही वर्णभेदाचा बळी? माजी कर्णधाराने केला खुलासा
दालमिया म्हणाले, "वार्षिक बक्षीस वितरण (समारंभ) २८ डिसेंबर रोजी होईल.'' बैठकीपूर्वी कॅबच्या सदस्यांनी दिवंगत सदस्यांना आणि खेळाडूंना श्रद्धांजली दिली. कोविडमधील परिस्थिती सुधारल्यास सामुहिक शोक सभा घेतली जाईल.
दिव्यांग क्रिकेटपटूंना विमा संरक्षण -
काही दिवसांपूर्वी, बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) ३० दिव्यांग क्रिकेटपटूंना विमा देण्याची घोषणा केली आहे. या खेळाडूंमध्ये श्रवणशक्ती, दृष्टिहीन आणि शारीरिक अपंगत्व असणार्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.