नवी दिल्ली - भारताचा महान खेळाडू सचिन तेंडूलकरने विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर आपली 'फेव्हरेट' ड्रीम 11 संघाची निवड केली. विश्वकरंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधून त्याने आपला संघ निवडला. महत्वाचे म्हणजे, सचिनने आपल्या संघात महेंद्रसिंह धोनीला स्थान दिलेले नाही. तसेच त्याने आपल्या संघाच्या कर्णधारपदी केनला पसंती दिली. मात्र, त्याने पाच भारतीय खेळाडूंचा समावेश संघात केला आहे.
सचिनने आपल्या संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडे सोपवले. सचिनच्या निवडीनुसार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो सलामीवीर असतील. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन फलंदाजी करेल. चौथ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजीला उतरेल. त्यानंतर बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन, इंग्लंडचा बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाचा नंबर लागला आहे.