महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या आरोपीला गुजरातमधून अटक - MS Dhoni daughter

कर्णधार एम.एस धोनीच्या मुली विरोधात अभद्र टिप्पणी करणाऱ्या आरोपीस गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. लवकरच कच्छ पोलिस आरोपींना रांची पोलिसांकडे सपुर्द करणार आहेत.

कर्णधार एम.एस धोनी
कर्णधार एम.एस धोनी

By

Published : Oct 12, 2020, 1:12 AM IST

अहमदाबाद - चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम.एस धोनीच्या मुली विरोधात अभद्र टिप्पणी करणाऱ्या आरोपीस गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. लवकरच कच्छ पोलिस आरोपींना रांची पोलिसांकडे सपुर्द करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, कच्छ पोलिसांनी अटक केलेला आरोपी अल्पवयीन आहे.

गुरुवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यादरम्यान आयपीएलमधील सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत १६७ धावा केल्या होत्या. कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाचा १५७ धावांपर्यंत मजल मारली होती. चेन्नईचा अवघ्या १० धावांनी पराभव झाला होता. चेन्नईच्या पराभवानंतर आरोपीने रागाच्या भरात सोशल मीडियावरून धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी कोलकाताविरोधातील सामन्यात फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर काही विकृत मनोवृत्तीच्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी दिली. धोनीची मुलगी ५ वर्षांची असून ती सध्या भारतातच आहे. IPL 2020 मध्ये अद्याप धोनीला आपली चमक दाखवता आलेली नाही. एका सामन्यात धोनीने ४७ धावा केल्या पण त्या सामन्यात त्याला मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे धोनीवर सातत्याने टीका केली जात आहे. परंतु याच बाबतीत काही व्यक्ती विकृतीचा कळस गाठत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details