हैदराबाद - इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेत चर्चेत आलेल्या ८७ वर्षीय क्रिकेट फॅन चारूलता पटेल यांचे निधन झाले. इंग्लंड विश्व करंडक स्पर्धेदम्यान, ८७ वर्षीय चारूलता यांनी स्टेडियमवर आवर्जुन उपस्थित राहून भारतीय संघाला सपोर्ट केला होता. बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी चारुतला या स्टेडियमवर आल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनीही त्यांची भेट घेतली होती. त्या सामन्यानंतर सोशल मीडियावर चारुलता पटेल यांचीच चर्चा रंगली होती. चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीने ही बातमी दिली.
भारतीय संघाच्या ८७ वर्षीय 'सुपरफॅन' चारुलता पटेल यांचं निधन
बीसीसीआयने चारुलता यांना श्रंध्दाजंली वाहिली आहे.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर चारुलता या चर्चेत आल्या होत्या. त्यांचे क्रिकेटप्रती प्रेम पाहून चाहतेच नव्हे तर भारतीय कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्माही अवाक् झाला होता. चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीने ही बातमी देताना लिहले आहे की, 'तुम्हाला कळवण्यात दुःख होतं की, आमच्या आजीने १३ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.'
कोण आहेत चारूलता पटेल -
चारूलता पटेल यांचा जन्म टांझानिया या देशात झाला. पण त्याचे आई-वडील हे मूळचे भारतीय. त्यांना क्रिकेटची फार आवड होती. त्या भारतीय संघाच्या फॅन होत्या. भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी त्या अनेकदा मैदानात आवर्जुन उपस्थित राहत असे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, बीसीसीआयने चारुलता यांना श्रध्दाजंली वाहिली आहे.