मुंबई - २०१९ मधील क्रिकेटचा हंगाम टीम इंडियासाठी सुखदायक असला तरी, २०२० हे वर्ष आव्हानात्मक असणार आहे. विराटसेनेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अतिशय नेत्रदीपक कामगिरी करत २०१९ ची समाप्ती केली. हाच फॉर्म भारतीय संघ २०२० मध्ये कायम राखतो का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा -युवा गोलंदाज नसीम शाह विश्वचषकाबाहेर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा निर्णय
२०२० या नवीन वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यात टीम इंडियाचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे. या महिन्यात भारतीय संघ तब्बल १० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असून क्रिकेटप्रेमींसाठी ही एक प्रकारे मेजवानीच ठरणार आहे.
टीम इंडिया २०२० चा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटी मैदानावर खेळणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाईल आणि टी-२० सामन्यासह विराटसेना २०२० वर्षाची सुरुवात करेल.
जाणून घ्या टीम इंडियाचे जानेवारी महिन्यातील वेळापत्रक तारीख | सामने | वेळ |
५ जानेवारी | भारत वि. श्रीलंका, पहिली टी-२०, गुवाहाटी | संध्या. ७ वाजता |
७ जानेवारी | भारत वि. श्रीलंका, दुसरी टी-२०, इंदूर | संध्या. ७ वाजता |
१० जानेवारी | भारत वि. श्रीलंका, तिसरी टी-२०, पुणे | संध्या. ७ वाजता |
१४ जानेवारी | भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिली एकदिवसीय, मुंबई | दु. २ वाजता |
१७ जानेवारी | भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरी एकदिवसीय, राजकोट | दु. २ वाजता |
१९ जानेवारी | भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरी एकदिवसीय, पुणे | दु. २ वाजता |
२४ जानेवारी | न्यूझीलंड वि. भारत, पहिली टी-२०, ऑकलंड | दु. १२.३० वाजता |
२६ जानेवारी | न्यूझीलंड वि. भारत, दुसरी टी-२०, ऑकलंड | दु. १२.३० वाजता |
२९ जानेवारी | न्यूझीलंड वि. भारत, तिसरी टी-२०, हॅमिल्टन | दु. १२.३० वाजता |
३१ जानेवारी | न्यूझीलंड वि. भारत, चौथी टी-२०, वेलिंग्टन | दु. १२.३० वाजता |