मुंबई - भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेच्या पॉटशेफस्ट्रूम येथील मैदानावर सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय युवा संघाला विराट कोहली अॅन्ड कंपनी पाठिंबा देत आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाचे खेळाडू प्रशिक्षक रवी शास्त्रींसमवेत टीव्हीवर सामना पाहत आहेत. याचा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर याच्यासह आजी-माजी खेळाडूंनी भारतीय युवा संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.