पुणे - भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील ही मालिका पुण्यात खेळवली जाणार आहे. भारतीय संघ या मालिकेसाठी पुण्यात दाखल झाला आहे.
इंग्लंड संघाचा भारत दौरा अंतिम टप्पात पोहोचला आहे. इंग्लंडच्या संघाने भारत दौऱ्याची सुरूवात कसोटी मालिकेतून केली. या मालिकेत इंग्लंडचा ३-१ ने पराभव झाला. यानंतर उभय संघातील टी-२० मालिका पार पडली. यात भारतीय संघाने ३-२ ने बाजी मारली. आता उभय संघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात आहे.
इंग्लंड-भारत यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका होणार आहे. यातील सामने २३, २६ आणि २८ मार्चला पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये होणार आहेत. भारतीय संघ या मालिकेसाठी पुण्यात दाखल झाला आहे.
भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
इंग्लंडचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम कुरेन, टॉम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, मॅट पार्किंसंस, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपले आणि मार्क वूड
हेही वाचा -Road Safety World Series : आज इंडिया-श्रीलंका लिजेंड्स यांच्यात 'महामुकाबला'
हेही वाचा -IND VS ENG : भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, ऑर्चर बाहेर