मुंबई - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा झाल्यानंतर टीम इंडियाच्या गोटात बदलाचे वारे वाहत आहेत. बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य आणि सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी नवीन अर्ज मागवले आहेत. मात्र, ही नेमणूक बीसीसीआयने घातलेल्या अटींवर होणार आहे. या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये रवी शास्त्रींव्यतिरिक्त गॅरी कर्स्टन, टॉम मुडी, यांची नावे असण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा किमान २ वर्षे अनुभव आणि ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेली असलेली व्यक्तीच प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरू शकणार आहे. मुख्य प्रशिक्षकांसह फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर आणि प्रशासकीय व्यवस्थापक या सर्वांसाठी बीसीसीआयने नव्याने अर्ज मागवले आहेत. आणि हा अर्ज भरण्यासाठी ३० जुलैच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.